Type Here to Get Search Results !

आटपाडीत मनसेची दमदार वाटचाल सुरु ; अविनाश जाधव यांच्या दौऱ्याने मनसे कार्यकर्ते रिचार्ज



आटपाडीत मनसेची दमदार वाटचाल सुरु ; अविनाश जाधव यांच्या दौऱ्याने मनसे कार्यकर्ते रिचार्ज

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधवहे १ नोव्हें. रोजी आटपाडी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. मनसे आयोजित पॅनकार्ड क्लब लि. बाधीत गुंतवणूकदारांचा मेळावा अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतीची त्यांनी पहाणी केली. त्यांच्या दौऱ्याने मात्र सध्या आटपाडीतील मनसैनिक रिचार्ज झाले आहेत.





दि.१७ सप्टेंबर रोजी शेटफळे येथे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांचे मार्गदर्शनाखाली  व उपजिल्हा अध्यक्ष  राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने ग्रामीण भागात प्रथमच खळ खट्याक  “मनसे स्टाईल” आंदोलन केल्याने तालुक्यातील नागरिकांना आटपाडीमध्ये मनसे असल्याची प्रथम जाणीव झाली.





शेटफळे-करगणी या रस्त्यासह इतर ७ रस्त्याचा राजपथ कंपनीने ओव्हरलोड वाहतुक करून रस्ते खराब केले ते रस्ते कंपनीने दुरुस्त करावेत अशी मागणी मनसेने प्रशासनाकडे केली होती. ग्रामस्थांनीही वेळोवेळी राजपथ कंपनी कडे पाठपुरावा केला होता. तरीही कंपनीने  कोणाचीच दखल न घेतल्याने  मनसेचे राजेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले होते.





या आंदोलनामुळे तालुक्यातून मनसेकडे तरुण आकर्षित होताना दिसत आहे. विविध ठिकाणी होणारे पक्ष प्रवेश आणि आटपाडीतील मेळाव्यात हजारोंच्या संख्येने पॅन कार्ड बाधितांचा पक्ष प्रवेश झाला. त्यामुळे मनसेची तिसरी आघाडी मतदारसंघात निर्माण होत असल्याने सध्या तरी आटपाडीत मनसे कात टाकताना दिसत आहे.


राजेश जाधव यांनी २०१८ मध्ये तालुक्यातील पहिला मनसेचा मेळावा घेऊन पक्षाचे ग्रामीण भागातले अस्तित्व दाखवून दिले होते. विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांनी ते जनतेच्या केंद्रस्थानी असतात. राजपथ कंपनीच्या आंदोलनात  राजेश जाधव, अमर पवार, अक्षय विभूते, पियुष ढगे, रोहन यादव, विशाल ईदाते यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या आंदोलनामुळे आटपाडीत मनसेला नवी ऊर्जा मिळाली आहे. मनसेचे  ठाणे-पालघरचे  जिल्हा अध्यक्ष  अविनाश जाधव यांच्या आटपाडी येथील अतिवृष्टीबाधीत  शेती पाहणी दौरा व संघटनात्मक बांधणी तसेच  पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे खानापूर-आटपाडी विधानसभेत मनसेचा जोर वाढतोय हे निश्चित.


नुकतीच कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत  शाबासकीची पाठ थोपटून   कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम  राज ठाकरे यांनी केले आहे. खानापूर मतदारसंघात पक्ष वाढीसाठी  राज ठाकरेंनी पदाधिकारी  यांना  सुचना दिल्या आहेत. लोकांच्या प्रश्नासंदर्भात  प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनं करावीत असा आदेशचा त्यांनी उपस्थित पदाधिकारी यांना दिला आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही मनसे पक्ष संघटना वाढावी यासाठी खानापूर मतदार संघातील आगामी काळात येणारी प्रत्येक निवडणूक ताकदीने लढवण्याची तयारी करण्याच्या सुचना त्यांनी सर्वांना दिल्या.


गेल्या काही महिन्यातील मनसे ज्या आक्रमकपणे  काही आंदोलने, उपोषणे, निदर्शने करत आहे त्याबद्दल समाधान व्यक्त होत असून  विविध पक्षप्रवेशा मुळे आगामी काळात आटपाडीत मनसे राजेश जाधव यांच्या नेतृत्वात आपले अस्तित्व दाखवेल.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies