'कराची स्विट्स' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका

'कराची स्विट्स' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दणका
मुंबई : मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला आहे. दुकान मालकांना मनसे थेट कोर्टात खेचणार आहे. याबाबत मनसेचे उपाध्यक्ष हाजी सैफ शेख यांनी 'कराची स्विट्स'च्या व्यवस्थापकांना नोटीस पाठवली आहे. 


'देशाचा पारंपारिक शत्रू देशाची राजधानी 'कराची' या नावाचा आधार घेत मुंबईत 'कराची स्विट्स' नावाची दुकानं सुरू करुन भारतीयांच्या राष्ट्रवादाला ठेच पोहोचवून व्यवसाय केला जात आहे. तसेच मराठी भाषेचा द्वेष केला जात आहे', असं मनसेचे नेते हाजी सैफ यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

हाजी सैफ यांनी याबाबत कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना कोर्टात खेचणार असल्याचंही म्हटलं आहे. दुकानावरील नाव तात्काळ हटविण्याची मागणी करत एक कायदेशीर नोटीससुद्धा हैदराबाद येथील कराची स्विट्सच्या व्यवस्थापकांना स्पीडपोस्टने पाठविण्यात आली आहे.  

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments