शहीद यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी अंत्यंस्कार
 शहीद यश देशमुख यांच्या पार्थिवावर  आज त्यांच्या मुळ गावी अंत्यंस्कार

जळगाव : जम्मू - काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पिंपळगांवच्या जवान यश दिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर  आज त्यांच्या पिंपळगांव या मुळ गावी लष्करी इतमात अंत्यंस्कार करण्यात येणार आहे. यश देशमुख यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका बाजुला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान आहे. तर  दुसऱ्या बाजुला तरुण मुलगा गेल्याचे मोठे दुःख आहे. यशच्या वडिलांनी सांगितले, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. देशासाठी त्याचे बलिदान झाले आहे.

जळगावमधल्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथले यश देशमुख रहिवासी होते. ते जून २०१९ मध्ये सैन्य दलात रुजू झाले होते. प्रशिक्षणानंतर त्यांची पहिलीच पोस्टिंग श्रीनगरमध्ये झाली होती. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. जवान यश दिगंबर देशमुख यांचा पार्थिव काल सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथे आणण्यात आला. नाशिकवरून सकाळी सहा वाजता त्यांचे पार्थिव रवाना करण्यात आले. त्यांच्या मूळ गावी साडेआठ वाजता पोहोचणार आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 


Post a Comment

Previous Post Next Post