राज्यातील धार्मिकस्थळे लवकरच उघडणार ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही 

राज्यातील धार्मिकस्थळे लवकरच उघडणार ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही 


 


राज्यातील धार्मिकस्थळे लवकरच उघडणार ; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही 
सांगली : अनलॉक प्रक्रियेत हळूहळू राज्यात चित्रपटगृह तसेच बऱ्याच गोष्टीना परवानगी सरकारने दिली असून गेली ७ ते ८ महिने कोरोनामुळे बंद असलेली राज्यातील धार्मिकस्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार केली जात असून लवकरच निर्णय होईल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी दिली.कोरोनाचे संकट संपलेले नाही. महाआघाडी सरकार जनतेची काळजी घेत आहे. मंदिरे खुली करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे नियोजन करून निर्णय घेणे गरजेचे आहे, असे म्हणाले. राज्यात आता वेगळे चित्र दिसणार आहे. एक लाट येत आहे. अनेकजण काँग्रेसमध्ये येतील, त्यामुळे पुन्हा काँग्रेसची ताकद राज्यात दिसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निधी वाटपातील अन्यायाबाबत ते म्हणाले, निधी वाटप चुकीचे होत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला नाही. तीन पक्षांचे सरकार आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments