Type Here to Get Search Results !

सांगवी येथील नव्वद पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात

 
माणदेश एक्सप्रेस न्युज 


पंढरपूर : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत.  'डॉ.रोंगे सर शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर  आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या या कठीण वेळी डॉ. रोंगे सरांनी केलेली मदत  मोलाची आहे.’ असे प्रतिपादन सांगवीचे सरपंच कांतीलाल गलांडे यांनी केले.


नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने राज्यात थैमान घातल्याने सर्वत्र पाण्यामुळे हाहाकार उडाला होता. पुरामुळे शेतीचे व पिकांचे दृष्य विदारक दिसत आहे. अशात स्वेरीचे डॉ. रोंगे सर सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी सांगवी (ता. पंढरपूर) येथे भेट देऊन सुमारे नव्वद पूरग्रस्त कुटुंबियांना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले. 


प्रास्ताविकात दिलीप भोसले यांनी डॉ.रोंगे सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची ओळख करून दिली आणि सांगवी मध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यावेळी डॉ. रोंगे म्हणाले की, ‘सांगवी मधील नागरिक पुराच्या परिस्थितीला गंभीरपणे तोंड देत जीवन जगत आहेत. खरंच त्यांच्या संयमाला  दाद द्यावी असे वाटते, कौतुक करावेसे वाटते. आपणा सर्वांना सध्याच्या परिस्थितीला तोंड देत संकटावर मात करायची असल्यामुळे कोणीही धीर सोडू नका. येथील अवस्था अत्यंत बिकट असून  फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून छोटीशी मदत करावीशी वाटली म्हणून येण्याचे प्रयोजन केले. तसेच सध्याची परिस्थती पाहता गरजू पूरग्रस्तांच्या पाल्यांना 'कमवा व शिका' योजनेतून स्वेरीमधील अभियांत्रिकी, फार्मसी व एम.बी.ए. या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण देण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल.’ असे डॉ. रोंगे यांनी सांगितले.

 यावेळी सांगवी मधील सुमारे नव्वद  पूरग्रस्त कुटुंबियांना जीवनावश्यक अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळकर, उपसरपंच बापूसाहेब बोंगाणे, संभाजी सत्रे, सुनील शिंदे, सुनील पाटील रामचंद्र कदम, पांडुरंग नाईकनवरे यांच्यासह सांगवी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies