ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : वैद्यकीय शाखेतील मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार उचलणार 

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : वैद्यकीय शाखेतील मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार उचलणार 


 ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : वैद्यकीय शाखेतील मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार उचलणार मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असून ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे राज्य सरकार वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्याद मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार देखील उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंबंधित चर्चा ठाकरे सरकारच्या मागील कॅबिनेट बैठकीतही झाली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष होते. अद्याप सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आणखी वाट पाहायला लावणे योग्य नसेल. कारण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष यामुळे वाया जाऊ शकते. 


 


मराठा आरक्षणाला स्थगिती असल्यामुळे सगळी प्रवेश प्रक्रिया थांबवता येणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. जर आरक्षणाचा लाभ मिळाला असता तरी जेवढी फी द्यावी लागली असती, तेवढीच फी द्यावी लागणार असून वरील अतिरिक्त भार सरकार उचलणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे यासंदर्भात तसा प्रस्ताव तयार करण्यात आल्यामुळे आरक्षण मिळाल्यास, जो फायदा झाला असता तोच फायदा आता विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments