एपीएमसी बंद ; नरेंद्र पाटील यांच्यासह आठ संचालकांची पदे बरखास्त : माथाडी कामगारांनी पुकारला बंद

एपीएमसी बंद ; नरेंद्र पाटील यांच्यासह आठ संचालकांची पदे बरखास्त : माथाडी कामगारांनी पुकारला बंद


 एपीएमसी बंद ; नरेंद्र पाटील यांच्यासह आठ संचालकांची पदे बरखास्त : माथाडी कामगारांनी पुकारला बंद
नवी मुंबई :  नरेंद्र पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हकालपट्टी करण्यात आल्याने माथाडी कामगार यांनी बंद पुकारला. दरम्यान, मार्केट बंद करु नका, असे आवाहन नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
कांदा बटाटा, मसाला आणि दाना या तीन मार्केटमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एपीएमसी बंद केल्याने व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. दरम्यान, भाजीपाला आणि फळ मार्केट मात्र सुरू आहे.आधीच कोरोनामुळे व्यावसायावर परिणाम होत असताना परत मार्केट बंद केल्याने व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. सरकार विरोधी वारंवार भूमिका घेतल्या गेल्याने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावरून नरेंद्र पाटील यांच्यासह आठ संचालकांची पदे सरकारने बरखास्त केली आहे. 


 त्याविरोधात माथाडी कामगार आक्रमक झालेत. मार्केट बंद करु नका. दिवाळी आहे. व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान करु नका. मला पाठिंबा दिला आहेत, त्याबद्दल मी आभारी आहे. मात्र, कोणाचे नुकसान होईल, असे काहीही करु नका, अशी प्रतिक्रिया नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments