भारतात नाकावाटे घेता येणारी लस तयार  

नवी दिल्ली : भारतात नाकावाटे घेता येईल अशी लसही तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने तयार केलेली लस पुढील वर्षात उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षात सिंगल डोस लस उपलब्ध होईल असा दावा कंपनीनं केला आहे. या लशीचे फक्त दोन ड्रॉप नाकात टाकले जातील.


  


 सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार टप्प्याटप्प्याने लसीकरण केलं जाईल आणि ज्यांना कोरोनाचा जास्त धोका आहे, त्यांना सर्वात आधी लस दिली जाईल. यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोरोना महासाथीत महत्त्वाची भूमिका बजावणारे इतर कोरोना वॉरिअर्सचाही समावेश असेल.  याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक आणि इतर आजार असलेले लोक, वयस्कर व्यक्ती यांचाही समावेश असेल.

  

दरम्यान लस आल्यानंतरही कोरोनाची महासाथ थांबणार नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अधानोम घेब्रियेसिस यांनी सांगितलं, फक्त लस कोरोना महासाथीला थांबवू शकत नाही.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post