“शुद्ध भगवा कुणाचा हे जनता ठरवेल” : संजय राऊत

“शुद्ध भगवा कुणाचा हे जनता ठरवेल” : संजय राऊत

 मुंबई : शिवसेना आणि आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगण्याचा इशारा देताना मुंबई महापालिकेवर  भगवा फडकवण्याचा निर्धार फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र तो भाजपचा असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.  

संजय राऊत म्हणाले की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा मुंबईतील मराठी माणसाने रक्त साडंले आहे. त्यामध्ये शिवसैनिकांचे योगदान राहिले आहे. शिवरायांचा भगवा मुंबईवर ५० वर्षांपासून फडकत आहे. मुंबईला वेगळे करण्याचा डाव सुरु आहे. शुद्ध भगवा कुणाचा हे जनता ठरवेल.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments