Type Here to Get Search Results !

पुणे  पदवीधर निवडणुकीत भाजपाची डोकेदुखी वाढणार


 


पुणे  पदवीधर निवडणुकीत भाजपाची डोकेदुखी वाढणार




पुणे : पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार असून भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत स्वतंत्र निर्णय घेतला आहे.




रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. एन. डी चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून अरूण लाड यांना अधिकृत उमेदवारी घोषित झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या भैय्या माने यांनीही निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे भैय्या माने अर्ज मागे घेणार की राष्ट्रवादीला पुन्हा बंडखोरीचा फटका बसणार हे आगामी काळात ठरेल, तुर्तास सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या उमेदवाराने अर्ज भरल्याने भाजपा खोत यांची समजूत काढणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies