अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह


 


अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्हनवी दिल्ली : कित्येक नेते आणि सेलिब्रिटी कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडले. बहुतेकांनी कोरोनाव्हायरसवर मातदेखील केली. आता आणखी एक अभिनेता चिरंजीवीदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. चिरंजीवीने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वत:हून दिली आहे. त्याने आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं ट्वीट केलं आहे.


 
चिरंजीवीनं ट्वीट केलं आहे की, फिल्म आचार्यचं शूट करण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार आपण कोरोना टेस्ट केली. आपली ही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. चिरंजीवीनं आपल्यामध्ये कोणतीही लक्षणं नसल्याचंही सांगितलं आहे. त्याने स्वतला क्वारंटाइन केलं आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसांत जो कुणी आपल्या संपर्कात आला त्यांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन चिरंजीवीनं केलं आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments