रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा RTGS उपलब्ध करून देण्याचा निर्णय : आता 24 तासात कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा RTGS उपलब्ध करून देण्याचा निर्णय : आता 24 तासात कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता

 
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट उपलब्ध करून देण्याचा  निर्णय घेतला आहे. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही RTGS च्या माध्यमातून 24 तासात कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. सध्या RTGS प्रणाली महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.RTGS अर्थात रिअल टाइल ग्रॉस सेटलमेंटच्या माध्यमातून त्वरित फंड ट्रान्सफर करता येईल. मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठी ही सुविधा वापरली जाते. RTGS च्या माध्यमातून 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर केली जात नाही. ही सुविधा तुम्ही ऑनलाइन किंवा बँकेच्या शाखेत जाऊन दोन्ही पद्धतीने वापरू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारचे फंड ट्रान्सफर शुल्क आकारले जात नाही. मात्र ब्रांचमध्ये RTGS मधून फंड ट्रान्सफर केल्यानंतर शुल्क द्यावे लागते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments