‘पार्थ पवारांना डावलले जाते आहे’ प्रियम गांधी यांच्या पुस्तकातील विधानावर रोहित पवारांचा खुलासा

 ‘पार्थ पवारांना डावलले जाते आहे’ प्रियम गांधी यांच्या पुस्तकातील विधानावर रोहित पवारांचा खुलासा 

सोलापूर : प्रियम गांधी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकात शरद पवार विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा देणार होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच पार्थ पवारांना डावलले जाते आहे आणि रोहित पवारांचे बळ वाढवले जात असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे पवार घराण्यात सारे काही आलबेल नाही अशी चर्चा या पुस्तकाच्या निमित्ताने रंगली आहे. परंतु हे सगळे दावे रोहित पवार यांनी फेटाळले आहेत.


यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी माझ्यासाठी नाते महत्वाचे आहे. पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीपेक्षा नाते कसे आहे हे मला जास्त माहित असल्याची प्रतिक्रिया सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.

त्याचबरोबर कोणतेही पुस्तक हे लेखकाच्या डोक्याने लिहिले जाते. माझा जास्त वेळ आज कोणत्या समस्या आहेत याबाबत वाचण्यात जातो. त्यामुळे हे जे काही पुस्तक आलेले आहे. केवळ त्याचे मी कव्हर पेज पाहिले आहे. पुस्तकात काय लिहिले आहे, याची मला माहिती नाही. आणखी काही गोष्टी पुस्तकात लिहिल्याचे कळले. ही माहिती त्यांना कुठून मिळाली हे पुस्तक लिहणाऱ्या व्यक्तीलाच विचारावे लागेल, असेही रोहित पवार म्हणाले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post