बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन

बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन


 


बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधनमुंबई : बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. वयाच्या ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


 
अभिनेत्री पूजा भट्टने ‘मेहंदी’ चित्रपटातील अभिनेता फराज खानच्या निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती देशवासीयांना केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटले जाते.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments