देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने ग्राहकांना केले अलर्ट

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने ग्राहकांना केले अलर्ट
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना विविध बँकिंग फ्रॉडबाबत अलर्ट केले आहे. कोरोना काळात बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे.


एसबीआयने असे म्हटले आहे की, जर तुम्ही परवानगीशिवाय एखाद्या रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय अपराध आहे. असे काम केल्यास कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. जर तुम्ही एखादा छोटा व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करणार असाल आणि अशावेळी एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचा किंवा त्यांच्या लोगोचा वापर परवानगीशिवाय केला तर तो दंडनीय अपराध आहे. असे वागणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते.


स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. एसबीआयच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि ब्रँड हँडलचा वापर केला जात असल्याचे या ट्वीट मध्ये म्हटले आहे. हा दंडनीय अपराध असून त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे यामध्ये म्हटले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments