Type Here to Get Search Results !

"सत्यासाठी सदैव संघर्ष" टीम निंबवडे प्रीमियर लीग २०२० चे मानकरी ; भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी उपविजेती"सत्यासाठी सदैव संघर्ष" टीम निंबवडे प्रीमियर लीग २०२० चे मानकरी ; भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी उपविजेती 

माणदेश एक्सप्रेस न्युज


निंबवडे : कोरोनाच्या महामारी मुळे २०२० या वर्षी बरेच कार्यक्रम रद्द झाले. इंडियन प्रीमियर लीग चे ही सामने प्रेक्षका विना बाहेर  च्या देशात खेळवावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निंबवडे प्रीमियर लीग चे सामने होतील की नाही याची शक्यता नव्हती, पण कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर अत्यंत कमी वेळेत साहेबराव मूढे युवा मंच निंबवडे ने या लीग आयोजन करत ४ थे पर्व पार पाडले. यंदाचा निंबवडे प्रीमियर लीग २०२० चा किताब “सत्यासाठी सदैव संघर्ष” टीमने भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी यांच्यावर अंतिम फेरीत मात करीत पटकावला.
निंबवडे प्रीमियर लीग २०२० मध्ये आठ संघांनी भाग घेतला होता. आटपाडी, माण-खटाव या तालुक्यातील ३० गावातून खेळाडू ची निवड करण्यात आली होती. यामध्ये १) सत्यासाठी सदैव संघर्ष, २) भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी (विक्रम) ३) साहिल ज्वेलर्स कोकरे नगर, ४) जय अहिल्या युवा मंच अनुसेवाडी, ५) न्यू क्रांती स्पोर्ट्स निंबवडे, ६) राजे वारियर्स कामथ, ७) भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी (संतोष), ८) सिद्धी इलेव्हन अनुसेवाडी या संघांनी भाग घेतला होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लीगमध्ये एक ही सामना न हरता सत्यासाठी संघर्ष टीम आणि साखळी फेरीतील चार सामने जिंकून भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी सेमी फायनल मध्ये पोहोचले. राहिलेल्या टीम मधून कॉटर फायनल खेळून जय अहिल्या अनुसेवाडी व साहिल ज्वेलर्स नगर टीम सेमीफायनलमध्ये दाखल झाल्या. अपेक्षा प्रमाणे सत्यासाठी सदैव संघर्ष आणि भुतोबा क्रिकेट क्लब वाक्षेवाडी फायनल मध्ये पोहचल्या. अत्यंत चुरशीच्या लढतीत सत्यासाठी सदैव संघर्ष टीम ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आठ षटकात च्या लढतीत चांगल्या सुरवाती नंतर भूतोबा क्रिकेट क्लबला ७६ धावा केल्या.
७७ धावांचा पाठलाग करताना सत्यासाठी सदैव संघर्ष टीम ने दोन तीन महत्वाच्या विकेट गेल्यानंतर सलामीला आलेले फलंदाज कॅप्टन विशाल बरकडे यांनी चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मालिकावीराचा किताब घाणंद गावचे व सत्यासाठी सदैव संघर्ष टीमचे अष्टपैलू खेळाडू दादा पाटील यांनी पटकावला. उत्कृष्ट फलंदाज हा किताब वरकुटे मलवडी गावचे भुतोबा क्रिकेट क्लब संघ वाक्षेवाडी टीमचे खेळाडू अभी आटपाडकर यांनी पटकावला. उत्कृष्ट गोलंदाज गोळेवाडी गावचे सत्यासाठी संघर्ष टीमचे खेळाडू आबा परळकर यांनी पटकावला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निंबवडे गावचे साहिल ज्वेलर्स कोकरे नगर टीम चे खेळाडू जयंत होळे यांनी पटकावला. अंतिम सामन्यातील सामनावीर चा पुरस्कार सत्यासाठी सदैव संघर्ष टीम चे खेळाडू आबा पडळकर यांनी देण्यात आला.ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी २०१७ साली सुरू झालेल्या या लीग ला पाहिले वर्ष वगळता १२,१२ टीम असायच्या पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार टीम कमी करून आठ संघ निवडले. यावर्षी नवीन मैदान असल्यामुळे फिल्डीग करणाऱ्या खेळाडूंना जरा व्यत्यय आला. भविष्यात चांगल्या मैदाना साठी सर्वांनी प्रयत्न करुया. कमी वेळेत चांगल्या नियोजन साठी साहेबराव मुढे युवा मंच चे खूप सहकार्य लाभले 

         साहेबराव मुढे

 आयोजक, निंबवडे प्रीमियर लीग २०२०


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies