शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? : भाजपा नेते नारायण राणे

शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? : भाजपा नेते नारायण राणे
मुंबई :  माजी मुख्यमंत्री भाजपा नेते नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंनी खार पोलीस स्टेशनला जाऊन राम कदम यांची भेट घेतली. कोरोनात आंदोलन करु नये यासाठी पोलिसांनी जनआक्रोश आंदोलनाला अडवलं, पालघरमध्ये ज्यापद्धतीने साधूंवर हल्ला झाला, हत्या झाली परंतु आरोपींवर कारवाई होत नाही म्हणून भाजपा आमदार राम कदम यांनी आंदोलन पुकारलं, हिंदुस्तान साधुसंताचा देश आहे, साधुसंतावर अन्याय होऊ नये यासाठी आंदोलन छेडलं होतं, पालघरचा तपास सीबीआयकडे जायला हवा. महाराष्ट्रात जे सरकार बसलं आहे, त्यांची साधुंना न्याय देण्याची इच्छा नाही असं नारायण राणेंनी सांगितले.
त्याचसोबत भाजपाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपदावर बसले, हिंदु धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला, मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात काहीच काम केले नाही, पिंजऱ्यात बसून राहतात त्यामुळे राम कदम यांना आंदोलन करावं लागतंय. २१२ दिवस होऊनही पालघरचा तपास पूर्ण होत नाही, त्याला विरोध करण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश मोर्चा काढला. 


शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडलं, त्यांच्याकडून काय अपेक्षा धरणार? कुठल्याही परिक्षेला बसत नाही, पास होत नाही, त्यामुळे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही असं शिवसेना नेते कायम म्हणतात. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष नाही, उद्धव ठाकरे हिंदुत्व विचारसरणीचे नाही, पदासाठी तडजोड करणारे आहेत. त्यामुळे शिवसेना हिंदुत्व असं समीकरण नाही असा टोलाही नारायण राणेंनी शिवसेनेला लगावला आहे.  

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments