Type Here to Get Search Results !

विधेयकांमधील तरतूदीबाबत केंद्र सरकारविरोधात शिवसेनेची 26 नोव्हेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक

 



मुंबई :  देशपातळीवरील सर्वपक्षीय कामगार संघटनांच्या कृती समितीने येत्या 26 नोव्हेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेशी संलग्न तसेच शिवसेना पुरस्कृत सर्व कामगार संघटनाही त्या बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.





कामगार कायद्यामध्ये सुधारणा सुचवणाऱया सामाजिक सुरक्षा कायदा, औद्योगिक संबंध कायदा आणि कामाची ठिकाणी कामगारांची सुरक्षितता व आरोग्य या तीन विधेयकांमध्ये 29 नव्या तरतूदी केंद्र सरकारने केल्या आहेत. सर्व कामगार संघटनांचा त्याला विरोध आहे. 





शिवसेना भवन येथे ‘भारत बंद’च्या पूर्वतयारीची महत्वाची बैठक झाली. शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांनी त्यात मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने कामगार कायदा सुधारणेच्या नावाखाली केलेले बदल हे मालक धार्जिणे असून कामगार कायद्यांद्वारे गेल्या कित्येक वर्षात वेगवेगळ्या कामगारांना मिळालेली सुरक्षितता त्यामुळे धोक्यात आली आहे. म्हणूनच सर्व कामगार संघटनांनी या कायद्याला विरोध करणे गरजेचे असल्याचे अडसुळ यावेळी म्हणाले. या बंदमध्ये शिवसेनेच्या सर्व कामगार संघटनांनी संपूर्ण शक्तीनिशी सहभागी व्हावे, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies