वाढीव वीजबिलांबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे

 
मुंबई :  वीज वापरली असेल तर बिल भरावेच लागेल, कुठलीही माफी आणि सवलत देणार नाही असं स्पष्टपणे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जनतेला सांगितले, इतकचं नाही तर राज्यातील वाढीव वीजबिलांबाबत  ठाकरे सरकारनेही कोणताही दिलासा नाही त्यामुळे लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात असणाऱ्या वीज ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र सरकारच्या या निर्णयावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे, परंतु तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन सरकारला इशाराच दिला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे.

 

जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" अशा शब्दात येणाऱ्या काळात मनसे वीजबिलाच्या माफीसाठी रस्त्यावर उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured