“तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का”? : या नेत्याचा सरकारवर निशाणा
मुंबई : निलेश आणि नितेश हे राणे बंधू विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारला वारंवार फैलावर घेताना दिसतात. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत “महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?,” असं ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. त्यानंतर आता यावेळी निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला आहे. 
वाढीव वीज बिलात सवलत न देण्याच्या मुद्द्यावरुनही निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान केलं. 'अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधारणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय का?', असा टोला निलेश यांनी ट्विट म्हणून लगावला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post