“वाढीव वीज बिलाबाबतचा राज्य मंत्रिमंडळाने विषय सोडलेला नाही” : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

“वाढीव वीज बिलाबाबतचा राज्य मंत्रिमंडळाने विषय सोडलेला नाही” : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
 “वाढीव वीज बिलाबाबतचा  राज्य मंत्रिमंडळाने विषय सोडलेला नाही” : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांनी विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांना वाढीव वीज बिल प्रश्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणालेत, राज्य मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही. काय करता येऊ शकते. काय करायला पाहिजे, या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे.
मुळामध्ये ‘वाढीव’ हा जो शब्द आहे तो वाढीव आहे का? हा विषय मंत्रिमंडळात पण चर्चिला जात आहे. खरंच मीटरमुळे काही बिले वाढलीयेत का? का दोन-तीन महिन्यांची बिले एकदम आली आहेत? त्यामुळे ती वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे तक्रारी आल्या, तिथे तिथे या वीज मंडळातील लोकं जाऊन मीटर चेक करून आली आणि ती चेक केल्यानंतर बहुतेकांच्या शंकेचं निरसन झालेले आहे. तरीदेखील अजूनही तो विषय मी काही सोडलेला नाही. मंत्रिमंडळाने सोडलेला नाही. काय करता येऊ शकते, काय करायला पाहिजे या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे. पण एक गोष्ट सांगतो, जे काय आता सगळे थयथयाट करण्याचा प्रयत्न करताहेत. त्यांच्यात आता काय ताकदच राहिलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments