बिग बींच्या 'झुंड' चित्रपटावर लावण्यात आलेली बंदी उठविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

बिग बींच्या 'झुंड' चित्रपटावर लावण्यात आलेली बंदी उठविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

 मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दमदार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. सुप्रीम कोर्टाने बिग बींच्या 'झुंड' चित्रपटावर लावण्यात आलेली बंदी उठविण्यास नकार दिला असून तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

 सध्या हा चित्रपट कॉपीराईटच्या वादाभोवती फिरत आहे. त्यामुळे तेलंगणा न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.  मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने हायकोर्टाच्या १९ ऑक्टोबरच्या आदेशाविरूद्ध सुपर कॅसेट इंडस्ट्रीज याचिका फेटाळून लावली आहे. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments