हायकोर्टाकडून ही दिलासा नाही ; अर्णब गोस्वामीची आजची रात्र जेलमध्येच 

हायकोर्टाकडून ही दिलासा नाही ; अर्णब गोस्वामीची आजची रात्र जेलमध्येच 


 


 


मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी याच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. मुंबई हायकोर्टातल्या याचिकेवरील आजची सुनावणी टळली असल्याने आजची रात्रसुद्धा अर्णब गोस्वामीला जेलमध्येच काढावी लागणार आहे.


 


  पोलिसांची अटक अवैध ठरवावी या मागणीसाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिकेवरील आजची सुनावणी टळली आहे. ती आता उद्या (शुक्रवार, 6 नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यामुळे आजची रात्रसुद्धा जेलमध्येच काढावी लागणार आहे. यामुळे अर्णब गोस्वामीच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.


 


  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments