भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात 

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात 


 


भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची कोरोनावर मात 
मुंबई :  भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून ते पुढील 7 दिवस होम क्वारंटाईन राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सेंट जॉर्ज रुग्णालयातून घरी परतल्यानंतर डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. फडणवीस यांना कोरानाची लागण झाल्यानंतर 10 दिवस रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची कोरोना चाचणी दहा दिवसानंतर निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून आज घरी परतलो. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!, अस ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments