दिवाळीमध्ये झालेल्या गर्दीचा परिणाम ; नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर मृत्यूची संख्याही 100 वर

दिवाळीमध्ये झालेल्या गर्दीचा परिणाम ; नव्या कोरोना रुग्णांची वाढ, तर मृत्यूची संख्याही 100 वरमुंबई :  महिनाभरापासून राज्यातल्या कोविड रुग्णांचा आकडा कमी झाला होता. आता दिवाळीनंतर मात्र त्यात थोडी वाढ झालेली दिसत आहे. दिवसभरात 5,011 नव्या रुग्णांची वाढ झाली. तर मृत्यूची संख्याही 100 वर गेली आहे. दिवाळीमध्ये झालेल्या गर्दीचा परिणाम म्हणून रुग्ण वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दिवसभरात 6,608 कोरोना रुग्णांनी कोविडवर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,30,111 एवढी झाली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17,57,520 एवढी झाली आहे.

खरच कोरोनाची दुसरी लाट येतेय की, काय अस चित्र दिसून येत आहे. दिवाळीच्या काळात सगळ्याच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जात होती. त्यामुळे सरकारने त्याबाबत इशाराही दिला होता.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
Post a comment

0 Comments