या राज्यात कोरोनासंदर्भात नवीन निर्बंध लागू ; रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत नाईट कर्फ्यू
 या राज्यात कोरोनासंदर्भात नवीन निर्बंध लागू ; रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत नाईट कर्फ्यू 

नवी दिल्ली : दिल्ली रुग्णांची संख्या लक्षात घेता पंजाब राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये बेडच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यास व अनुकूलित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयांच्या मदतीने लाभ मिळावा यासाठी मुख्य सचिव विनी महाजन यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत. 

 एनसीआरमध्ये कोरोनाची गंभीर स्थिती पाहता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी राज्यात नवीन निर्बंध लागू केले आहेत, सर्व शहरांत व बाजारपेठांमध्ये पुन्हा रात्रीचा कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत १ डिसेंबरपासून मास्क न घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन न करणाऱ्यांकडून दुप्पट दंड आकाराणी करण्यात येणार आहे.


पंजाबमधील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि लग्न सोहळे रात्री ९.३० वाजता बंद होतील, रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू राहील. पंजाब सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना प्रोटोकॉलचे पालन न केल्यास आता ५०० रुपयांऐवजी १ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. १५ डिसेंबर रोजी रात्रीच्या कर्फ्यूचा आढावा घेतला जाईल.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post