अभिनेत्री उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशावरून या भाजप खासदारांची शिवसेनेवर टीका
 अभिनेत्री उर्मिलाच्या शिवसेना प्रवेशावरून या भाजप खासदारांची शिवसेनेवर टीका जालना : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब केल्यानतंर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा देत शिवसेनेला टोला लगावला आहे.

शिवसेनेत ऊर्मिला मातोंडकर या प्रवेश करणार असल्याचे ऐकले आहे. माझ्या मातोंडकर यांना शुभेच्छा आहे. त्यांनी काँग्रेसकडून अगोदर नशीब आजमावले, त्यात त्यांना अपयश आले होते. आता बघू त्यांचे नशीब बदलते की शिवसेनेचे नशीब बदलते, असा टोलाही प्रीतम मुंडे यांनी सेनेला लगावला.


केंद्राच्या पीएम निधीमधून प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर हे आले असून यात राज्याच्या कोणताही वाटा नाही. राज्य सरकारकडून कोविड सेंटर उभारण्यात अक्षम्य दिरंगाई झाल्याची टीका प्रीतम मुंडे यांनी केली.

हे सरकार कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्या बाबतीत सुडाचे राजकारण करणारे असून आमच्या अनेक निर्णयांना या सरकारने स्थगिती दिल्यामुळे हे महाविकास आघाडीचे बिघाडी आणि स्थगिती सरकार असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

Previous Post Next Post