“हे आरक्षणाचे दुष्परिणाम” : मुद्गल यांच्यावर टीका करताना कंगनाचे आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य

“हे आरक्षणाचे दुष्परिणाम” : मुद्गल यांच्यावर टीका करताना कंगनाचे आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य
मुंबई : महिला आयपीएस अधिकारी डी. रुपा मुद्गल या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दिवाळीत फटाके उडवण्यावरुन त्यांनी केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. या वादामध्ये अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील उडी घेतली. कंगनाने डी. रुपा यांना पोलीस विभागावर डाग असल्याचे म्हणत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र यावेळी रुपा मुद्गल यांच्यावर टीका करताना कंगनाने आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

रुपा यांच्यासारखे अधिकारी हे आरक्षणामुळे एवढ्या मोठ्या पदावर पोहचतात असा टोला कंगनाने ट्विटवरुन लगावला आहे. जेव्हा एखाद्या अयोग्य आणि लायक नसणाऱ्या व्यक्तीला पद मिळते तेव्हा त्यांच्याकडून त्रास दिला जातो. हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत, असं कंगना रुपा यांच्याबद्दल बोलताना म्हटली आहे. तसेच मला रुपा यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती नाहीय मात्र मला खात्री आहे ती त्यांचा हा संताप त्याच्यातील अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेला आहे, असंही कंगनाने म्हटलं आहे. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments