“त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावे” : नेते अधीर रंजन चौधरी यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त

“त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावे” : नेते अधीर रंजन चौधरी यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त

 नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या दुरवस्थेकडे बोटे दाखविण्यापेक्षा योग्य वाटेल त्या पक्षात जा किंवा स्वतःचा पक्ष काढा, अशा शब्दात काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फटकारले आहे. पक्षाच्या पीछेहाटीबद्दल कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतीक्रिया देताना ते बोलत होते.

त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे या मुद्द्याला हवा मिळून काँग्रेसमधील नव्या, जुन्यांचा वाद पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस हा पक्ष आपल्यासाठी योग्य नसल्याची ‘ज्येष्ठां’ची समजूत झाली असेल तर त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावे किंवा स्वतःचा पक्ष काढावा, असे ते म्हणाले. वास्तविक हे सर्व ज्येष्ठ नेते एकेकाळी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळ होते. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याशी ते अजूनही संपर्क साधून आपली बाजू मांडू शकतात किंवा पक्षांतर्गत कोणत्याही व्यासपीठावर आपले मुद्दे मांडू शकता, असेही ते म्हणाले.
या ज्येष्ठ नेत्यांना पक्षाच्या भवितव्याची एवढी चिंता असती त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात भाग घेऊन आपली निष्ठा सिद्ध करण्याची संधी साधने आवश्यक होते. मात्र, त्यांच्यापैकी एकही जण या निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कामात दिसलेला नाही, असेही चौधरी यांनी सांगितले.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments