लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी १ जानेवारीपासून असा असेल नियम

लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी १ जानेवारीपासून असा असेल नियम

 लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी १ जानेवारीपासून असा असेल नियम 

नवी दिल्ली : देशभरात लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना १ जानेवारीपासून मोबाइल नंबरच्या आधी शून्य लावावे लागणार आहे. दूरसंचार विभागाने ट्रायच्या या निर्णयाला मान्यता दिली आहे. ट्रायने या प्रकारच्या कॉलसाठी मोबाईल क्रमांकाआधी शून्य लावण्याची शिफारस २९ मे २०२० रोजी केली होती. या निर्णयामुळे दूरसंचार कंपन्यांना अधिक क्रमांक देणे सोयीस्कर होणार आहे.

दूरसंचार विभागाने २० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या एका परिपत्रकात म्हटले की, लँडलाइनवरून मोबाइलवर नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या ट्रायच्या शिफारशीला मान्यता देण्यात आली आहे. यामुळेप मोबाइल आणि लँडलाइन सेवांसाठी पुरेशा प्रमाणात नंबर देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या परिपत्रकातील उल्लेखानुसार हा नियम लागू करण्यात आल्यानंतर लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करण्यासाठी मोबाइल क्रमांकाच्या आधी शून्य जोडावे लागेल. 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments