“आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

“आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा
 “आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. सगळी चौकशी झाल्यानंतर १२० नेत्यांची यादी आपण पाठवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजPost a comment

0 Comments