एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा

एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल : प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा


 


एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल: प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा


 


मुंबई : बाळासाहेबांकडे जे धाडस होते तसेच धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही असल्याचे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाळ वर्मा यांनी म्हंटले आहे. रिपब्लिक टीव्हीचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली.राम गोपाळ वर्मा यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की अर्णब गोस्वामीवरील कारवाई पाहून मला समाधान वाटले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखविली आहे. एका किंचाळणाऱ्या बोक्‍याला थेट पिंजऱ्यात टाकल आहे. समाजात घडणाऱ्या विविध घटनांवर ते नेहमीच प्रतिक्रिया देतात. कोणाची भिडभाड न ठेवता ते ट्‌विटही करीत असतात. अर्णब गोस्वामी यांच्यावर रायगड पोलिसांनी केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आहे.वर्मा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत. बाळासाहेबांकडे जे धाडस होते तसेच धाडस उद्धव ठाकरे यांच्याकडेही असल्याचे वर्मा यांना म्हणायचे आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्याने नाराजी होती. आता अर्णब गोस्वामीवर कारवाई झाल्याने राम गोपाळ वर्मा यांनी समाधान व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांचेही कौतुक केले आहे. 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments