Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्रीपदाबाबत जेडीयू आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम : नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार


 


मुख्यमंत्रीपदाबाबत जेडीयू आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम : नितीशकुमारच मुख्यमंत्री होणार




पटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर पुन्हा एकदा संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा नितीशकुमार मुख्यमंत्र्यांची शपथ घेतील. सुत्रांच्या माहितीनुसार, हा शपथविधी सोहळा 16 नोव्हेंबरला होऊ शकतो. नितीशकुमार यावेळी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. याआधी २००० मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या निवडणुकीनंतर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनीच शपथ घेतली आहे.




यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्ये भाजपाने  सर्वाधिक जागा जिंकल्या. त्यामुळे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री हा  भाजपाचा व्हावा, अशी मागणी काही भाजपचे नेते करीत होते. पण, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सायंकाळी भाजपाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत जेडीयू आणि भाजपामध्ये सुरु असलेल्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.



 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies