Type Here to Get Search Results !

पडळकर, भिंगे, बनकर पक्ष सोडून का गेले? बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले कारण
पडळकर, भिंगे, बनकर पक्ष सोडून का गेले? बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले कारण

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी : लोकसभा व विधानसभेला सवर्च राजकीय पक्षासमोर तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सध्या आउटगोइंगचा सामना करावा लागत आहे. ज्या प्रमाणे समुद्राला भरती व आहोटी असते त्याप्रमाणेच सर्वच राजकीय पक्षामध्ये भरती व आहोटी असते. ज्यावेळी पक्षाला चांगले दिवस यायचे असे दिसते त्यावेळी इतर पक्षातील अनेक नेते त्या पक्षामध्ये जाण्यास इच्छूक असतात.
असाच काहीसा प्रत्यय सध्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाला येत आहे. कारण लोकसभा व विधानसभेला या पक्षामध्ये अनेक नेते आले होते. त्यांनी लोकसभा व विधानसभा लढवित इतर सर्वच राजकीय पक्षासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते. यामध्ये सर्वात प्रथम नाव येते ते सध्या आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांचे. लोकसभेला भाजपकडून त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आल्यावर त्यांनी पक्षाला “जय मल्हार” करीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश करीत सांगली लोकसभेचे तिकीट मिळविले व भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना आव्हान दिले. यावेळी त्यांनी वंचित आघाडी कडून राज्यामध्ये सर्वात अशी ३,००,२३४ एवढी मते मिळवली होती. तर नांदेड लोकसभा मतदार संघातून अशोक चव्हाण यांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या प्रा. यशपाल भिंगे यांना १,६६,१९६ एवढे मतदान घेतले होते. तर चंद्रपूर विधानसभा मतदार संघामधून निवडणूक लढविलेल्या अनिरुद्ध वनकर यांनी १५४०३ मते घेतली होती.
परंतु सध्या या तिघांनीही वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडला आहे. यामध्ये प्रथम विधानसभेला गोपीचंद पडळकर यांनी पक्ष सोडत थेट बारामती मधून अजित पवार यांना आव्हान दिले होते. त्यामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेचे तिकीट देत आमदारकी दिली. तर सध्या राष्ट्रवादीकडून प्रा. यशपाल भिंगे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी तर काँग्रेसमध्ये अनिरुद्ध वनकर यांना ही राज्यपाल नियुक्त आमदारकी मिळणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य करीत पडळकर, भिंगे, वनकर यांनी पक्ष का सोडला याचे कारण सांगत इतर पक्षांना आमदारकी साठी माणेसच नसल्याचे सांगत काँग्रेस, राष्ट्रवादी वर आपला निशाला साधला आहे. त्यांच्याकडे विधानपरिषदेसाठी लायक उमेदवारच नाहीत त्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीतील लोकांना उमेदवारी दिल्याचे सांगितले.  

संकलन : दिपक प्रक्षाळे 


Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies