Type Here to Get Search Results !

 माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले महाराष्ट्राचे कौतुक


 


 माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले महाराष्ट्राचे कौतुक




मुंबई – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून चाचण्यांचे दर कमी करणे, एचआरसीटी चाचण्यांच्या दरांवर नियंत्रण, प्लाझ्माच्या दरावर, महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांना लागू करणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम यासारखे चांगले व अभिनव निर्णय घेतले असून महाराष्ट्राचे ते निर्णय अन्य राज्यांसाठी उपयुक्त ठरतील, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचे कौतुक केले.



 


प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत राज्यातील सर्व खासगी डॉक्टरांना विमा संरक्षण मिळण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. राज्य सरकार दिवाळी व हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेत असलेल्या कोरोनाविषयक खबरदारीबाबत राजेश टोपे यावेळी माहिती दिली. राज्यातील अॅक्टीव्ह केसेस कमी झाल्या आहेत. राज्याचा मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकर निदान लवकर उपचार यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies