“मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचं काम पोलिसांचे आहे” : निलेश राणे

“मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचं काम पोलिसांचे आहे” : निलेश राणे


 


“मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचं काम पोलिसांचे आहे” : निलेश राणेमुंबई –अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक केली, त्यानंतर रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अलिबाग कोर्टात हजर केले, याठिकाणी कोर्टाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळत अर्णब गोस्वामींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मात्र या प्रकरणात आता माजी खासदार निलेश राणे यांनी वेगळं वळण दिलं आहे. निलेश राणे म्हणाले की, इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांनी आईसह आत्महत्या केली असेल हे पटत नाही, तर त्यामागे पैशाचं कारण असू शकत नाही. ४-६ कोटींसाठी आईसह आत्महत्या का केली असावी? हा प्रश्न पडतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार अन्वय नाईक यांची संपत्ती ३०० कोटींपर्यंत होती, मी तेथील काही लोकांशी चर्चा केली, त्यांनीही ही शंका उपस्थित केली. चौकशीतून सत्य बाहेर येईल असं ते म्हणाले.
तसेच सुशांतच्या मृत्यूप्रकरणात ७० दिवसांत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या दबावाखाली पुरावे दडपण्याचा प्रयत्न केला असं मी म्हटलं होतं, मी लीड देऊ शकतो, तपास करण्याचं काम पोलिसांचे आहे. दिशा सालियान-सुशांत प्रकरणात जे बोललो त्यावर आजही ठाम आहे, त्या ७० दिवसांत पुरावे नष्ट करण्याचं काम झाले ते समोर आणावं, सत्य जनतेसमोर येईल असंही निलेश राणेंनी सांगितले.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments