बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आसिफ बसरा यांची गळफास लावून आत्महत्या

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आसिफ बसरा यांची गळफास लावून आत्महत्या


 


बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते आसिफ बसरा यांची गळफास लावून आत्महत्या
मुंबई : बॉलिवूड  हरहुन्नरी अभिनेता आणि रंगभूमी कलाकार आसिफ बसरा याने गुरूवारी हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा येथे गळफास लावून आत्महत्या केली. जोगिबाडा रोडवरील एका कॅफेमध्ये त्याने गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे. 


आज दुपारी आसिफ बसरा आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन फिरायला गेला होता. घरी आल्यानंतर आपल्या या कुत्र्याच्या पट्ट्याने त्याने गळफास घेतला. आसिफ हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, असे कळते.रिपोर्टनुसार, आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मक्लोडगंजच्या एका भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत एक विदेशी महिला सुद्धा राहत होती. या महिलेसोबत आसिफ लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची चर्चा आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a Comment

0 Comments