Type Here to Get Search Results !

सत्यजीत तांबे यांच्या 'श्रद्धा और सबुरी' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा


 


सत्यजीत तांबे यांच्या 'श्रद्धा और सबुरी' ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा


 



मुंबई :  सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर 'श्रद्धा और सबुरी' असं ट्वीट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होता तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं.सत्यजीत तांबे यांचे वडील हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून सध्या विधानपरिषदेचे आहेत आहे. विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचं नावं नाही.तर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे महसूल मंत्रीही आहेत




दरम्यान महाविकास आघाडीकडून राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठीच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त नावं जाहीर होताच काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १२ जणांच्या या यादीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेल्या दोघांना स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून आलेल्या नंदुरबारमधील चंद्रकांत रघुवंशी यांची वर्णी लावली आहे. पण वंचितच्या उमेदवाराला संधी दिल्याने विदर्भ काँग्रेसमधील असंतोष जाहीरपणे समोर आला आहे.



महाविकास आघाडीकडूने देण्यात आलेली 12 नावे



राष्ट्रवादी काँग्रेस: 
एकनाथ खडसे (समाजसेवा आणि सहकार) 
राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा) 
यशपाल भिंगे (साहित्य) 
आनंद शिंदे (कला)



काँग्रेस:
रजनी पाटील (समाजसेवा आणि सहकार) 
सचिन सावंत (समाजसेवा आणि सहकार)
मुझफ्फर हुसेन (समाजसेवा) 
अनिरुद्ध वनकर (कला)



शिवसेना:
उर्मिला मातोंडकर (कला)
नितीन बानगुडे पाटील 
विजय करंजकर 
चंद्रकांत रघुवंशी


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies