Type Here to Get Search Results !

“पदवीधर निवडणुकीत आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे” : रावसाहेब दानवे

 




परभणी : केंद्रीय मंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे परभणी येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दानवे म्हणाले,” कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा,” असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.






“राज्यात सरकार कसं स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. मात्र, सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू. आम्ही सध्या फक्त होणाऱ्या निवडणुका पार पडण्याची वाट बघत आहोत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन काम करायचं की, महाराष्ट्रात आपण सरकार स्थापन करणार आहोत,” असं आवाहन दानवे यांनी केलं.





“पदवीधर निवडणुकीत आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे. भाजपाकडे विधानसभेत बहुमत असलं पाहिजे. या निवडणुकीत तीन पक्ष भाजपाविरूद्ध लढत आहेत. मात्र, त्यांचा एकमेकांवरच विश्वास नाहीये,” अशी टीकाही दानवे यांनी महाविकास आघाडीवर केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपानं शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या घटनेच्या वर्षपूर्तीच्या दिवशीच दानवे यांनी भाजपा राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे.




Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies