अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन विजयी ; ट्रम्प यांचा पराभव ; अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी दिली माहिती 

अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन विजयी ; ट्रम्प यांचा पराभव ; अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी दिली माहिती 


 


 


मुंबई : जगातील बलाढ्य महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला असून जॉ बायडन हे विजयी झाल्याच्या बातम्या अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.


 


  संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले होते. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जो बायडन यांच्यात निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. एकमेकांवर मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावर निवडणुकीच्या निकालामध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. 


  त्यामुळे नक्की कोण विजयी होणार हे सांगता येत नव्हते. परंतु सध्यातरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विजयी झाल्याचा दावा अमेरिकेच्या प्रसार माध्यमांनी केला आहे. त्यामुळे अमेरिकेतील निवडणुकीत सत्ता बदल झाला आहे. 


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments