“आम्ही पोपट पाळत नाही, पोपट तेच पाळतात” : चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला उत्तर

“आम्ही पोपट पाळत नाही, पोपट तेच पाळतात” : चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला उत्तर


 


“आम्ही पोपट पाळत नाही, पोपट तेच पाळतात” : चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला उत्तर


 नागपूर : अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. शिवसेनेने भाजपावर टीका करताना भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं असं परिवहन मंत्री अनिल परब पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला उत्तर देत अर्णब आमचा पोपट नाही, पोपट पाळण्याची सवय शिवसेनेलाच आहे असं म्हटलं आहे. 


“भाजपा असं ओरडतंय‌‌ जणू काही तो पक्षाचा‌ कार्यकर्ता आहे. यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्याचा‌ प्रश्न कुठे येतो, सुडबुद्धीनं कारवाई करण्यात आलेला आरोप चुकीचा असून अर्णब गोस्वामीला भाजप नेते‌ का‌ वाचवत‌ आहेत?,” अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे. “अर्णब गोस्वामी यांना गुन्हेगार म्हणून अटक केलेली नाही, त्यांना तपासासाठी घेतलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं. तसंच भाजपाच्या पोपटाला पिंजऱ्यात कोंडलं अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 “अर्णब गोस्वामी हा आमचा पोपट नाही. आम्ही पोपट पाळत नाही पोपट तेच पाळतात” असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या अटकेचा निषेध केला आहे.अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीचा कडून विरोध केला आहे. अर्णब गोस्वामी यांची अटक म्हणजे पत्रकारितेची गळचेपी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


Post a comment

0 Comments