सरकारी कामात अडथळा ; अर्णब गोस्वामी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल 

सरकारी कामात अडथळा ; अर्णब गोस्वामी विरोधात आणखी एक गुन्हा दाखल 


 


 


मुंबई : संकट मागे लागले की ते हात धुवून मागे लागते यांचा प्रयत्य सध्या रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना येवू लागला आहे. कारण त्यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


  


 


  अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी घरातून अटक केली. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अर्नब गोस्वामीवर मुंबईतल्या एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


Post a comment

0 Comments