भाजपच्या आणखी एका माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा ; राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता

भाजपच्या आणखी एका माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा ; राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता 

औरंगाबाद :  माजी खासदार आणि मंजी मंत्री भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. 


माजी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप नेते जयसिंग गायकवाड यांना पदवीधरची उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. 

याबाबत जयसिंगराव गायकवाड म्हणाले की, "मी पक्षाकडे पक्षबांधणीसाठी पदाची मागणी केली होती ती मात्र भाजपाकडून ती पूर्ण न झाल्यामुळे आपण प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments