Type Here to Get Search Results !

काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची ईडी कडून कसून चौकशी
काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांची ईडी कडून कसून चौकशी पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून शुक्रवारी कसून चौकशी झाली. ईडीच्या पथकाने भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर छापा टाकल्याचे समजते आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर भोसले यांच्यावर झालेली कारवाई राजकीय क्षेत्रात चर्चेची ठरली आहे. भोसले यांच्या चौकशीचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नाही. 

भोसले यांची मुंबईत चौकशी सुरू असताना त्यांच्या पुण्यातील निवासस्थानीही ईडीच्या पथकाने छापा टाकला, मात्र, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची पथके शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाली होती. भोसलेंच्या बाणेर परिसरातील बंगल्यावर ही पथके पोचल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना मुंबईत बोलावल्यावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासोबतच अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.


 मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत संबंध असलेल्या भोसले यांचा बांधकाम व्यवसाय प्रामुख्याने पुण्यात आणि मुंबईत आहे. देशभर त्यांची कंपनी पायाभूत बांधकाम क्षेत्रात काम करते. त्यांच्या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. भोसले यांच्यावर ईडीने यापूर्वी फेमा कायद्यांतर्गत कारवाई करीत १ कोटी ८३ लाखांचा दंड केला होता. २००७  साली अमेरिका आणि दुबई दौरा करून भारतात येताना परकीय चलन व महागड्या वस्तू अबकारी शुल्क न भरता चोरून आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली होती. त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला होता. 

शिवाजीनगरच्या यशवंत घाडगेनगरमधील जमीन बेकायदा हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून भोसले यांच्यासह सहा जणांच्या विरोधात २०१६ साली चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याविरुद्ध राजेश बजाज यांनी फिर्याद दिली होती. भोसले यांच्यावर यापूर्वी प्राप्तिकर विभागाने छापे टाकत महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यावेळी त्यांचे जावई आणि काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या कार्यालयावरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies