रिपाईंचे नेते रामदास आठवले कोरोनामुक्त

रिपाईंचे नेते रामदास आठवले कोरोनामुक्त

 मुंबई : रिपाईंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा कोरोना चाचणीचा अहवाल २७ ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते १२ दिवसांनी घरी परतले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज फोन करून माझ्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. कोरोना बाधा झाल्यानंतर 12 दिवस उपचार घेऊन आता तब्येत चांगली झाल्याची त्यांना माहिती दिली. माझी तब्येत अधिक चांगली व्हावी यासाठी पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे”, असे ट्विट करून त्यांनी या चर्चेची माहिती दिली.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments