प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, निर्माता निखिल द्विवेदी याला कोरोनाची लागण

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, निर्माता निखिल द्विवेदी याला कोरोनाची लागण
मुंबई : कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता, निर्माता निखिल द्विवेदी याला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्याच्यावर उपचार सुरु आहेत.


निखिल गेल्या काही दिवसांत सर्दी आणि खोकल्याच्या त्रासामुळे त्रस्त होता. दरम्यान त्याने एकदा कोरोना टेस्ट दिली. त्याची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने पुन्हा एकदा टेस्ट करुन पाहिली. यावेळी मात्र त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. निखिल सोबतच त्याच्या कुटुंबीयांची देखील टेस्ट घेण्यात आली होती मात्र घरातील सर्व मंडळी निगेटिव्ह आहेत. सध्या अभिनेत्यावर त्याच्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरु आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments