“प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे” : महापौर किशोरी पेडणेकर

“प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे” : महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईतही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “राज्यात दिवाळीमध्ये  प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे,” असं कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल,” अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली आहे.

“लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे. शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल,” अशी भीती महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केली.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a comment

0 Comments