विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीचा विचार करून दिवाळी सुट्टीत वाढ

विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीचा विचार करून दिवाळी सुट्टीत वाढ

विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीचा विचार करून दिवाळी सुट्टीत वाढ  
मुंबई - विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या वाढीव दिवाळीच्या सुट्टीच्या मागणीचा विचार करून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 नोव्हेंबर 2020 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.5 नोव्हेंबर 2020 मधील परीपत्रकानुसार 12 नोव्हेंबर 2020 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी केवळ 5 दिवसांचीच दिवाळी सुट्टी यंदा देण्यात आली होती. मात्र, आता परिपत्रकात बदल करून 14 दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज

Post a comment

0 Comments