Type Here to Get Search Results !

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख



पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून सांगलीचे संग्रामसिंह देशमुख



सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्यावतीने सांगली जिल्ह्यातील खानापूरचे दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांचे पूत्र व सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.



संग्रामसिंह देशमुख सध्या जिल्हा बँकेत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते. या सर्व कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. देशमुख समथर्कांनी उमेदवारी जाहीर होताच जल्लोष केला.


 



पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपने सांगली जिल्ह्यातील देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies