राज्यातील कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट दिलासादायक

राज्यातील कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट दिलासादायक


राज्यातील कोरोना रुग्ण रिकव्हरी रेट दिलासादायक 
मुंबई : राज्यात कोरोना महामारी आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 91.35 टक्के इतका झाला आहे. त्यामुळे राज्यासाठी हि दिलासादायक बाब आहे.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यात 5 हजार 27 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 11 हजार 60 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आतापर्यंत एकूण 15 लाख 62 हजार 342 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 161 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.63 टक्के इतका झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 91.35 टक्के इतका झाला आहे.


 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज


Post a comment

0 Comments